प्रेम अधुरे
प्रेम अधुरे
शब्दांवाचून भाव सारे, पोरकेच झाले
तुझे टाळणे मला, आता रोजचेच झाले
कसे निनादती तुझे, शब्द मम कानी
आपल्यात कधीही ना, बोलणेच झाले
ना मृत्यूस प्राप्त झालो, ना वाचलो पुरा मी
वार तुझ्या विरहाचे मजवर, तोकडेच झाले
रुदन अंतरी तुझ्या, मी ही अंतरीच रडलो
हे किनारे आसवांचे कोरडेच झाले
लिहितो जरी अखंड, तुझे टाकून पाश पाठी
तुझ्याविना ना पूर्ण काव्य, कोणतेच झाले
जन्म तुझ्यासवेचा, मागेन मी पुन्ह्यांदा
या जन्मी तुला पाहणेही, थोडकेच झाले
