STORYMIRROR

Pandit Warade

Tragedy

4  

Pandit Warade

Tragedy

तृषार्त कावळा

तृषार्त कावळा

1 min
609

तृषार्त कावळा

(अष्टाक्षरी)


एक तृषार्त कावळा

होता खूप तहानला

थेंबभर पाण्यासाठी

रानोमाळ भटकला।।१।।


होते ऊन तापलेले

जीव कासावीस होई

इथे तिथे भटकतो

पाणी प्याया झाली घाई।।२।।


शोध घ्यावया जलाचा

करीतसे धावाधाव

उन्हामुळे कावळ्याची

मुकी झाली कावकाव।।३।।


रानी फिरता फिरता

माठ तयासी दिसला

त्याच्या पूर्वजांचा धडा

तेव्हा त्याला आठवला।।४।।


भर उन्हात उडतो

एक एक खडा घेतो

चोचीमध्ये धरोनिया

खडे माठात टाकतो।।५।।


माठ खड्याने भरला

पाणी आले नाही वर

वाट पाहून तयाच्या

जीवा लागे घरघर।।६।।


पाणी माठातच नाही

कसे यायचे वरती

माठा सारखी कोरडी

झाली सकल धरती।।६।।


पाणी पाणी म्हणतच

काक मरण पावला

"जाग आतातरी नरा"

सांगे तृषार्त कावळा।।७।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy