STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Tragedy Inspirational

4  

Ganesh G Shivlad

Tragedy Inspirational

जीवन एक संघर्ष

जीवन एक संघर्ष

1 min
316

टिकून राहण्यासाठी कायम, 

संकटे येथे मुळीच येत नसतात..!

निश्चित असतात वेळा जाण्याच्या, 

त्या फक्त माहीत नसतात..!


संघर्ष जीवनातील संकटांचा, 

हा संपत जाणार आहे..!

कोडे सुटावे शब्दांचे, 

तसा तो सुटत जाणार आहे..!


एक शब्द सुचावा, 

तसा दुसराही सहज सुचणार आहे..!

एक मार्ग मिळावा, 

तसा अजुन मिळतच जाणार आहे..!


करतो सामना जो संकटांचा, 

त्यालाच त्या वेळा साथ देतात..! 

न घाबरता न डगमगता, 

त्याचीच ही गणिते सुटत जातात..!


कात टाकून, कांती निखरावी नागिनीची, 

तसे उभे आयुष्य उजळून निघते, 

सोसून संकटे..!

पण धीर सोडून डगमगल्यावर, 

कधीच सोडत नाहीत वाट, नागिनी सारखी, 

तीच संकटे..!


सापडल्यावर संकटात जे धीर देतात, 

तेच असतात आपल्या खूप जवळचे..!

पळून जातात..अन् आपल्यालाच बोलतात, 

ते मात्र नुसते वरण भाताचे..!


चुकेल अथवा होईल बरोबर निर्णय, 

आपला आपणच घ्यावा लवकर..!

नसेल क्षमता निर्णय घेण्याची, 

तर पुढे, अंधार मानावा खडतर..!


दैवी शक्ती असते पाठीशी, 

नाही दिसणार 'ती' नजरेने..! 

पण देते सामर्थ्य 'ती' संकटात, 

अदृष्यपणे, फक्त सत्याच्याच बाजूने..!


उठ तू.. संघर्ष कर.. 

संकट जीवनाचा भागच आहे..!

चाल तू.. कष्ट कर.. 

विजय निश्चित तुझाच आहे..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy