STORYMIRROR

BABAJI HULE

Tragedy Others

4  

BABAJI HULE

Tragedy Others

II आभाळ फाटले II

II आभाळ फाटले II

1 min
243

परतीचा पाऊस परतीच्या वाटेवर कोसळतोय

अंधाऱ्या रात्रीत एकटाच जोर लावून बरसतोय

सकाळचे स्वच्छ निरभ्र आकाश दुपारी होतेय काळेभिन्न

कडाडणाऱ्या विजांनी शेतावरच्या अन्नदात्यांचे मन होतेय सुन्न

माहीत नाही कमी दाबाचा पट्टा कि नक्षत्रांचा खेळ

दिशाहीन वारा आणि कोसळणाऱ्या धाराचा तरी कुठे बसतोय मेळ

कुणी म्हणतेय ढगफूटी तर कुणी म्हणतेय चक्रीवादळ

परंतु शेताच्या बांधावरती बसून दिसतंय फक्त फाटलेल आभाळ

नद्या, ओढे,नाले सर्व काही धावू लागले किनाऱ्याबाहेर

हातातोंडाशी आलेल्या पिकांना माहित नाही कोणाची लागलीय नजर

कोरडा कि ओला माहित नाही पण नेहमीच दुष्काळाचं सावट 

कोणाच्या आधारावर शेतकऱ्यानं ओलांडावी हि वादळाची वाट

आसमानी संकटाची नाही लागत कधीच चाहूल

परंतु भरल्या पिकांची मात्र होते नेहमीच धूळधाण

अन्नदाताच नेहमी भरडला जातो प्रत्येक वेळोवेळी

कधी नैसर्गिक संकटे तर कधी सरकारच्या धोरणांचा बळी

या निर्दयी पणाचा कुठे गोडवा तर म्हणे धरणे भरली

परंतु कुठे डोळ्यातील आसवेच आटेना कारण शेतीच वाहून गेली

माहित नाही हि निसर्गचक्राची थोरवी का महंती

परंतु वरूण राजाची मात्र वाढलीय भलतीच भटकंती

शेतकरी राजा आता नको करू पापरंपारिक नक्षत्रांची शेती

हा अवकाळी कधीही बरसेल आणि करील तुझ्या पिकांची माती 

बदलत्या हवामानप्रमाणे आपणच आता पिकांची फेररचना करू

कितीही आभाळ फाटलं तरी सरकारकडून नाही अपेक्षां धरू.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy