STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy

4  

Abasaheb Mhaske

Tragedy

त्याला कुठे माहित असत ?

त्याला कुठे माहित असत ?

1 min
478

कळीन अलगद उमलायचं ....

भ्रमरान तिजभोवती फिरायचं

रीत अशी ही जगावेगळी ....

प्रीत हिलाच का म्हणायचं ? 


विरहान तळमळायचं आम्ही ....

तिनं बिनधास्त जगायचं

तिनं शोधायचं पर्याय अन

क्षणार्धात सारं काही संपवायचं 


कळीचही फुल होत अन

देव्हाऱ्यात सजवलं जात

सुकून जाता तेंच पुढे ...

निर्माल्य होऊन मातीत मिसळत  


त्याला कुठे माहित असत ?

सुगंध आवडतो सर्वाना ....

निर्माल्याची दुःख वेदना

एरव्ही कोण पुसत ?



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy