आठवणींचे फुलं ...
आठवणींचे फुलं ...
आठवणींचे फुलं
तरारून येतात
नित्य नेमाने
हमखास दररोज
आठवणींचे फुलं
मन प्रफुल्लित
तर कधी उदास
भकास ,निर्विकार
आठवणींचे फुलं
सोबत करतात
सावलीसारखा
पाठलागही ...
आठवणींचे फुलं
चालतात बरोबरीनं
तर कधी छळतात
बिनादिक्कत हक्कानं
आठवणींचे फुलं
सुकत नाही की
थकत नाही कधी
येण्या - जाण्यानं