STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Action

3  

Abasaheb Mhaske

Action

सरतातच हरामखोर साले दिवस...

सरतातच हरामखोर साले दिवस...

1 min
252

आले तसे भुर्रर्र होतात दिवस

जुन्याचेच गोडवे गातो हमखास

आठवणींचे पक्षी घोंगावतात अन

पुन्हा होतात फुर्र न लागता अदमास 


पुन्हा सुरु होतो पाठशिवणीचा खेळ

काळराती नंतरचा तो उष:काल

बसतोच सुख दुःखाचा ताळमेळ

अन जीवन मरणाचा अनंत प्रवास


आले दिवस , गेले दिवस

होत्याचे नव्हते झाले दिवस

भावविभोर ओले दिवस कधी

सरतातच हरामखोर साले दिवस


इतिहासाची पुनरावृत्तीही ठरलेलीच 

अंधेरी नगरीतील सत्तेचा माज

मग अनागोंदी कारभार, अराजक

पुन्हा सुवर्णयुगाची सोनेरी पहाट 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action