तू म्हणाली होतीस
तू म्हणाली होतीस


तू म्हणाली होतीस
डोळ्यात पाणी आणून
आता तुझा -माझा
मार्ग वेगळा ...
मी शिळा होऊन स्तब्ध जाहलो
न बोलताही सांगून गेले
थरथणारे ओठ तुझे अन
डोळ्यातील ती अर्थवाही भाषा
तुझं - माझं प्रेम जणू
मृगजळच तर होतं
मिलन आकाश धरतीच
आभासी क्षितिज होतं