STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Action Others

4  

Abasaheb Mhaske

Action Others

मिळुनी वाचवू साऱ्या जगाले...

मिळुनी वाचवू साऱ्या जगाले...

1 min
246

चल रे दोस्ता , खाऊन खस्ता

कष्टाची भाजी - भाकरी बरी गड्या

अवघड घाट , नागमोडी पायवाट

विसरू नको रे ओळखीचा रस्ता


माहीत आहे ना तुला गड्या

अंती जीत आपलीच होईल

जाणून - बुजून ती स्वार्थी जत्रा

हेही दिवस निघून जातील मित्रा


अरे लढणे आपल्या रक्तातच

घेतला वसा टाकू नको रे

पोर - सोर ,भरला संसार तुझा

अधांतरी सोडून फास गळी लावू नको


असे कित्येक आले - गेले

फ्रेंच,डच मुघल ,फिरंगी

हिटलर , मुसोलिनी , सद्दाम हुसेन

क्षणार्धात होत्याचे नव्हते झालेच ना ?


काय यार मित्रा तू असा खचू नको रे

लोक म्हणतील पळपुटा सारे

हिम्मत तू बघ हारु नको रे

मिळुनी वाचवू साऱ्या जगाले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action