STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

4  

Abasaheb Mhaske

Others

आपण सर्व भूमिजन

आपण सर्व भूमिजन

1 min
507

नाळ आमुची या मातीशी

ऋण आम्हावरी या भूमीचे 

सृजनाचे आम्ही उद्गाते

तत्पर आमुची सदैव लेखणी

आपण सर्व भूमिजन...

 

चला उठा रे जागे व्हा...

उघड्या डोळ्यांनी जग पाहा

जाती - पातीच्या तोडुनी भिंती

झेप घेऊया गगनावरती...

आपण सर्व भूमिजन...

 

शेतकऱ्यांनो, कष्टकऱ्यांनो

तुम्ही जगाचे पोशिंदे, तारणहार

मिळुनी सारे हात हाती घेऊन सारे

हरीतक्रांतीचे स्वप्न साकारुया

आपण सर्व भूमिजन...

 

कुणी रक्षण करणारे शूर शिपाई

कुणी लेखक, चित्रकार, शिल्पकार

कुणी डॉक्टर, वैज्ञानिक, नेताजी

एक होऊया भारतभूमीचे सुपुत्र आम्ही

आपण सर्व भूमिजन...

 

बीज रोवुया मानवतेचे...

स्वप्न साकारू महापुरुषांचे 

पुन्हा नव्याने एक होऊया...

विसरुनी सारी व्यर्थ भ्रमन्ती

आपण सर्व भूमिजन...

 

गाडून घेऊ स्वतःला...

बीजापरी अंकुरण्या पुन्हा

फुलापरी सुंगधित करूया धरती

भलेही आमुची नानाविध भाषा

आपण सर्व भूमिजन...

 

सर्वंकष क्रांतीची मशाल घेऊ हाती

शिवरायांचे आम्ही मावळे...

फुले, शाहू, आंबेडकरांचे पाईक आम्ही

सिद्ध होऊया मानवतेचा धर्म स्थापन्या  

आपण सर्व भूमिजन...


Rate this content
Log in