STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy

3  

Abasaheb Mhaske

Tragedy

रोखील का कुणी हा माजलेला वळू?

रोखील का कुणी हा माजलेला वळू?

1 min
208

बाप रे बाप डोक्याला ताप

पोटी आला साप आता

करून- करून करणार काय ?

बिलकुल अडाणी अंगुठाछाप


बाप रे बाप रोज नवे झमेले

चालूच पदोपदी खोटे बोलणे

खोटे का असेना पण रेटून नेणे

वरतून स्वप्नात रममाण होणे


बाप रे बाप किती हा सरडा

रंग बदलतो नवा- नवा

गोड बोलून काटा काढतो

हेतू साधतो शिताफीने


बाप रे बाप कसा हा बेडूक

किती रे हा कूपमंडूक

मारतो उड्या इकडून तिकडे

हाहाकार माजवतो चोहीकडॆ


बाप रे बाप लागली धाप

सांगताना त्याचे उपद्व्याप

श्रोतेजनहो ! तुम्हीच सांगा

रोखील का कुणी हा माजलेला वळू?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy