STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy

4  

Abasaheb Mhaske

Tragedy

स्वातंत्र्याची सत्तरी ओलांडली तरीही ...

स्वातंत्र्याची सत्तरी ओलांडली तरीही ...

1 min
280

अपेक्षांचं ओझं ,अनिवार धावणं

निष्क्रीय होताहेत हातपाय

उमेदीच वार गेलं कुठे ?

जगणं झालं जणू कोंडवाडा


कशाचं काय अन फाटक्यात पाय

फाटकी झोळी , फुटकी थाळी

पाहण्यात नव्हतं ते खाण्यात आलं

जाणून - बुजून ते ठोसर भिकारी 


कसलं रामराज्य आणि कसलं काय ?

खऱ्याच खोटं,लबाडाचं तोंड मोठं

तू कर मारल्यासारख अन

मी करतो रडल्यासारख


आपणच दिली चोऱ्यांच्या हाती तिजोरीची चावी 

आता काय बघत बसावं तमाशा नी त्यांची मुजोरी

दोन वेळची भाकर नि अंगभर कपड्यासाठी दिशा दाही

लोकशाहीचा राजा स्वातंत्र्याची सत्तरी ओलांडली तरीही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy