पुरुषार्थ
पुरुषार्थ


नवरात्रीच्या नऊ दिवसात "ति"ची पूजा करतोस
तिचाच अवतार असणाऱ्या स्त्रीची तू काय दशा करतोस?
रोजच करतो बलात्कार,रोजच करतो अत्याचार,
आयुष्य देणार्या स्त्रीचे तू असेच फेडतोस उपकार?
आई,बहीण,बायको सगळं देवाला मागतोस
आणि गर्भामध्येच इवल्याश्या जीवाला मारतोस?
रक्षण करून स्त्रीचे गाजव तुझा पुरुषार्थ,
तरच उरेल रे माणसा तुझ्या जगण्याला अर्थ..