आई
आई
1 min
347
तोडून आज पान्हा, सोडून गेली तू
पोरका हा झाला कान्हा कोठे गेलीस तू
डोळे नव्हते उघडले,जग होते पहायचे
साथ नसेल जीवनाची पण थोडे तरी थांबायचे..?
आज येते आठवण तुझी क्षणाक्षणाला
उणीव तुझी जाणवूनी रडू येते डोळ्याला
आजही वाटते मला 'आई' तुला डोळे भरुनी पहावं
तू नसशील तरी आठवणींना थोडं मनात साठवावं
