बळीराजा...!
बळीराजा...!
रात्र भयाण सरली, पहाट होत आहे
परी पोशिंदा जगाचा जग सोडून गेला आहे
भार जगाचा वाहत होता सारा
देह आज त्याचा दोरीला लटकत आहे
येतील हजारो मदतीचे हात
होते दडून जेव्हा होता तो हयात
जीव ओतून कष्ट केले पण दैवाने ओढून नेले
काळ्या आईचे मोती पाण्यात वाहून गेले
होती गरज जेव्हा हात मदतीचे होते मंद
आज गोळा झाली दुनिया पण आवाज होता बंद
झालं गेलं आता सगळं ते राहुद्या
'बळी'च्या बकऱ्याला थोडं 'राजा'सारखं वागू द्या
