STORYMIRROR

Åtole Đhîřü

Tragedy

2  

Åtole Đhîřü

Tragedy

महासत्ता...!

महासत्ता...!

1 min
284

पोरांना दोन वेळची भाकर मिळत नाय

म्हणून धाय मोकलून रडली माझी माय

नुसतं तोंड दिलंय म्हणून बोलतोय

कधी गरिबीचं जगणं जगून पहाय

म्हणे डिजिटल इंडियाचं आभाळात गेलं यान

जगणं जड झालेल्या शेतकऱ्यांचं आहे कोणाला ध्यान?

GDP GST च सगळेच करताय कॅलक्युलेशन

रोजच्या उपाशी झोपणाऱ्या पोटावर आहे कुठलं सोल्युशन?

सोनं नाणं, पैसे अडका म्हणे सुधारत चाललाय देश

आधुनिकतेच्या काळात का बदलत नाही शेतकऱ्याचा वेष?

खूप झालं पण गप्प बसून चालणार नाही आत्ता

बदलला माझा शेतकरी तरच माझा देश होईल महासत्ता...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy