स्त्री वेदना
स्त्री वेदना
स्त्री म्हणजे सरीता
नेहमी मर्यादेतच राहते
पचवून घेते सारे अपमान
वरून शांतच भासते
न पेलणारे ओझेही होकार देत स्विकारते
सर्वांच्या सुखासाठी दिनरात्र झटते
सारं काही सहन करुनही नंदादीप बनते
अचानक कधी ज्योतीची ज्वालाही होते
दुःखाच्या झळा तिलाही लागल्या तरी
प्रदर्शन त्यांच मांडत नाही
होरपळून निघते संसारात तरी
रडगाणे गात नाही
नवरा तिचा मुलगाही तिचाच
सार काही कळूनही परकीच ठरते
प्रसंग आला समोर की
तिच्या अज्ञानावर शिक्का मोर्तब होते
सगळ्यांच्या आवडी जपतांना मन तिचे मारते
सर्वांना माया लावूनही तिच मायेविना जगते
त्रागा करते कधी
कधी तर दुर्गेचा अवतार बनते
क्षणभराचा राग गेला की स्थिरावते
सर्वांनसाठी जगून ही
तिच अस्तित्व मान्य होत नाही तेव्हा
मनाच्या वेदनेलाही अर्थ उरत नाही
वेदना आणि स्त्रीचे नातेच आहे असे
आजपर्यंत ते कुणालाही कळले नाही
