STORYMIRROR

RajaniLungase Lungase

Others

4  

RajaniLungase Lungase

Others

झोका

झोका

1 min
583

माझा झोका तुझा झोका 

झोका झोकाच राहिला 

उंच उंच नेवून गगनी 

भूईवर आला 

भूईवर नाही जागा 

झोका अधांतरी गेला 

मना- मनात आमच्या 

येर-झारत राहिला 

झोका मनाच्या झरीत

आभाळाच्या आर-पार 

संसारात त्याची तऱ्हा 

अनोख्या वाऱ्यागत 

झोका दिमाखात भारी 

त्याची आकाशात भरारी 

थांबवू त्याला कसा 

मनाला आली उभारी 

झोक्या झोक्या थांब आता 

जीव माझा गलबलला 

माझ्या धरतीच्या स्पर्शासाठी 

जीव आता असुसला


Rate this content
Log in