STORYMIRROR

RajaniLungase Lungase

Others

4  

RajaniLungase Lungase

Others

गांधारी

गांधारी

1 min
404

कोण म्हणते मी गांधारी 

फक्त महाभारतातच आहे

प्रत्येक स्त्री च्या आजूबाजूला

गांधारीचेच अस्तित्व आहे

अंधत्व पाहून पतीचे

तिने स्वतःला पट्टी बांधली

पण डोळे झाकून ठेवले म्हणून 

अंधाराचे जाळे नाही मिटले 

आजूबाजूच्या अंधाराला

गांधारींच्या अस्तित्वाची चाहूल लागते आहे

पिढ्यान पिढ्या दडपते स्त्रीला

जखडून बंदिस्त करते

तेव्हा एखादी तेजस्विनी

गांधारीची भूमिका धिक्कारते

तू झालीस गांधारी 

पुराण परंपरावादीही तुच हो!

मी मात्र बाजूला टाकते गांधारीला 

स्वतःचा शोध मीच घेते 

माझे जीवन मलाच जगायचे आहे

ह्या वास्तवाचे भान मी ठेवते

रूढीने पट्टी बांधली तरी 

तिचं पारदर्शकत्व मीच ठरवते

गांधारीला अंधत्व देण्यापेक्षा 

धृतराष्ट्राचे डोळेच मी बनते


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন