STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Tragedy

4  

Sakharam Aachrekar

Tragedy

माझी शेवटची प्रेमकविता

माझी शेवटची प्रेमकविता

1 min
3K

काजव्यांच्या अंधुक प्रकाशात आज तुला शोधलं

डोळ्यांतल्या आसवांच्या गर्दीत मन माझं कोंडलं

मनाच्या नाजुक तारांना तुझ्या नकाराचं वारं झोंबलं

प्रचंड दुःखाच्या सागराने मन माझं वेढलं


वेळ आली तुझ्यासोबत आता पुन्हा अनोळखी बनण्याची

उरली वेळ आता फक्त तुला स्वप्नी बघण्याची

संपली ओढ मनीची तुझ्यासाठी जगण्याची

वाट पाहतोय निराशेने मी प्रसन्न मरणाची


आग्रह मैत्रीचा वाटे तुझा सर्वांहून निराळा

न्याय माझ्या प्रेमाला नाही तुझा मिळाला

नाही उरला जीवनाला अन्य कोणी सहारा

दिसतोय निखळताना मला माझ्या प्रेमाचा शुक्रतारा


सांगू कुणा माझ्या या आगळ्या दुःखाची व्यथा

संपूर्ण आयुष्याची जणू बनली हास्यकथा

करतो इथे माझ्या एकतर्फी प्रेमाची सांगता

अन संपवतो तुझ्यावरची माझी शेवटची कविता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy