आर्त क्षण
आर्त क्षण
अर्थ क्षणांचे
स्वप्नं बिलोरी
अबोली डोळ्यांत साठवत
आणि गर्भार वेदनांना
गोठलेल्या मनातल्या मनातच आठवत
पुन्हा एकदा निघालोय
एकांतल्या मौनाच्या जंगलात
अपमानाला गिळत
काळजावर गोंदवलेल्या
"त्या " वेदनांना जाणीवपूर्वक लपवत
लादलेल्या हक्काला
काळोखात गाडत
प्रत्येक पाऊलाला आणि
प्रत्येक क्षणांना डांबून ठेवत
निघालोय ....
त्याच निबीड जंगलात
ते आर्त क्षण
त्या गर्भार वेदनांच्या तळाशी
लपलेल्या देहावरच्या खुणांचे
नेमके अर्थ शोधण्यासाठी
