STORYMIRROR

Sangeeta Deshpande

Tragedy

4  

Sangeeta Deshpande

Tragedy

अर्घ्य

अर्घ्य

1 min
140

दोन थेंबाचे अर्घ्य

का सुन्या आठवांना?

जीवन सारे व्यापले

विसरू कसे क्षणांना


पिंपळपान वहितले

जीवापाड जपलेले

मोरपिस मनीचे ते

का उगीच हिरमुसले?


कडू गोड असेनात का

हृदयी माझ्या बिलगल्या

जख्मा अशा कित्येक

अश्रुत त्या लपलेल्या


दोष मुक्या प्रारब्धाला

मी न कधीच दिलेला

मार्गातला तो काटाही

प्रेमाने नित्य कुरवाळला


ठेव हृदयात फक्त असे

आठवांचीच ठेवलेली

स्मरणात रोजच पहाते

विखुरलेली राख स्वप्नांची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy