STORYMIRROR

Sangeeta Deshpande

Abstract

4  

Sangeeta Deshpande

Abstract

पाऊस

पाऊस

1 min
270

माझ्या अंगणी पाऊस

गंध घेऊनिया आला

थेंब थेंब पावसाचा

पानोपानी ओघळला


मन वीणा झंकारली

आठवांचा सूर छेडता

अंग अंग मोहरले

ओठी तुझे नाव येता 


धुंद करूनिया गेला

तनु गंध तो बावरा

आवरू कसे नकळे

खुळ्या ह्या मन पाखरा


नादावूनी पाऊसही

रिक्त होऊनिया गेला

रिमझिम बरसुनी

मन गाभारा भरला


अभिषेक आसवांचा

केला असा स्मरणानी

चित्त सैरावैरा झाले

 स्मृतीगंध आठवूनी


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Abstract