STORYMIRROR

Sangeeta Deshpande

Others

4  

Sangeeta Deshpande

Others

महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा

1 min
395


राष्ट्रात राष्ट्र एक असे राष्ट्र 

जया म्हणती सारे महाराष्ट्र ।।धृ।।


मातीचा टिळा लेवुनी भाळी

निधड्या छातीचे जन्मले वीर

यशो गाथा सांगण्यास अवतरले

 महान शाहिर,संत अन् फकीर ।।


शिवबा,जिजाई होते थोर माय लेक

सह्याद्रीच्या कुशीत करी ते सुराज्य

टिळक, फुले आगरकर अन् अनेक

झटती करण्यास हो अवघे सुराष्ट्र ।।


राष्ट्रात राष्ट्र एक असे राष्ट्र 

जया म्हणती सारे महाराष्ट्र ।।


सुजलाम, सुफलाम करण्यास वाहे

गोदा,तापी, पंचगंगा अन् सरस्वती 

मराठा तितुका मेळवा म्हणतो वारकरी

आचरूनी थोर संतांची हो अंभगवाणी 


किर्लोस्कर,पेंढारकर आदि उद्योजक 

विकासाच्या कामास लावी हातभार

सावरकर,फडके अन् बंधू चाफेकर

सर्वस्व अर्पण, मुक्त करण्यास राष्ट्र  


राष्ट्रात राष्ट्र एक असे राष्ट्र 

जया म्हणती सारे महाराष्ट्र ।।



Rate this content
Log in