STORYMIRROR

Sangeeta Deshpande

Others

4  

Sangeeta Deshpande

Others

ग्वाही

ग्वाही

1 min
235

लिहिन म्हणतो कहाणी सुखी क्षणांची

घालू नको खोडा आठवून वेदना दुखाची


गोंदवल्या जख्म जरी हृदयावर कैकदा

फुंकर ही घातली वेळोवेळी सहानुभुतीची


द्वाड मन नेहमी रमते खेळात तुलनेच्या

अंकुश ठेवला तयास घालून बेडी संस्काराची


पौर्णिमेचा चंद्र दरवळतो आताशा मनात

दाखवून सत्य लावू नको किनार आमावस्येची


कसे म्हणू जगलो जे जे ते सर्व भ्रम होता

नित्य घेतली ग्वाही वास्तवाच्या पारदर्शकतेची


Rate this content
Log in