पहिला पाऊस पाहिला...
पहिला पाऊस पाहिला...


खोटं सांगू, तर या मुंबईच्या मोसमातील पहिला पाऊस पाहिला आणि
खरं सांगू, तर या हृदयाला जोडेल अशी 'ती' नाळ पहिली...
पहिल्या पावसात मनमुराद भिजत 'ती' होती आणि
तिला पाहत स्वच्छंदी झुरत होतो 'मी'...
तिच्या चेहऱ्यावर ओथंबणारे थेंब तिची मौज दाखवत होते आणि
माझ्या चेहऱ्यावरचे भाव दाखवत होते मला हवी असणारी ती...
खोटं सांगू, पहिल्यांदा फिल्मी शुटिंग पाहत असल्याचा भास झाला आणि
खरं सांगू, तिचा तो फिल्मी आनंद माझ्या हृदयात कायमचा कैद झाला...
'सरी'वर 'सरी' बरसत असताना तिला येणारी हलकीशी 'सर्दी' आणि
दूरवर चहाचा घोट घेत आडोशाला बसलेला 'मी-दर्दी'...
एक वेळ वाटलं तिच्या सोबत नाचावे पण
दुसऱ्या क्षणाला वाटले तिला फक्त नाचताना पाहत राहावे...
खोटं सांगू, तर मी पावसात तिला चिंब भिजताना पाहिलं आणि
खरं सांगू, तर पहिल्यांदा माझं मन या मुंबईच्या धकाधकीतून चिंब ओलं राहिलं...