बाप
बाप
1 min
244
बाप बाप बाप सागराहूनी महान
तळपत्या जिवाची भागवितो तहान !!धृ. !!
बाप पेक्ष्या नाही किंमत कशाचीच
अमृताहुनी गोड वाणी आहे बापाचीच
जगामधी बाप काम करुनि सुहान !! १ !!
नकारात्मक नाही कधिही घेतली छाया
सकारत्मक विचाराने जागविली माया
आम्हाला योग्य मार्गाची दाऊनी किरण !! २ !!
संकट समई अरे बाप ओरडतातं
बाप कानी शब्द येता भय निघुनी जातं
स्वर्ग, धरती, पाताळात बाप जाऊन !! ३ !!
बापमध्ये पाहून घ्यावे देव भगवंत
बापानेच जन्मा घातिले तारे शिलवंत
वारा, पाऊस, ऊन करी बाप सहन !! ४ !!
शिक्षणासाठी बापाचा हा जीव धडपडे
संस्काराची बाप सदा गिरवितो धडे
दिली आम्हाला ज्ञानाची शाळा उघडून !! ५ !!
शिस्तबद्ध जीवन हे ठेवीतं समतोल
बाप जगामधी आज ठरला अनमोल
स्वतःच्या जीवाला नर्शी ठेऊनी गहाण !! ६ !!
