परकी का जाहले
परकी का जाहले
आज जाणिले मिच मला परकी का जाहले
या जगीतील होऊनी मीच मला का विसरले
कधी काळची कोमलांगी का नक्षत्रा भुलले
जाणुनी मानस परका तरी का आपले मानले
क्षणा क्षणाचा असतो हिशोब त्रयस्था जिवाले
मीच मला का असे ओळख करूनी दावले
शब्दाविण झंकारतो मनीचा तो कुंचला छळे
अशी एकल्या रानी मिच मला न ओळखले
भाव वेगळे मनातले असे गतप्राण जाहले
जाणता अजाणता मिच मला का न पाहीले
नजरेतील तुझ्या त्या छबीस स्वत:स मानिले
हृदयातील स्पंदनतली सारि स कधी न जाणिले
अनुभूतीचे गीत मीच शब्द होऊनी गायिले
गीत तुज मनी भावताच परक्यासम वागिले
अशी कण कण अयुष्यातुनी निसटत गेले
जाणुनी परके भाव स्वत:स मोजू लागले
जीवास भावलेली मी प्रतिमेत का शोधिले
सल मनाची केवल, मीच मला परकी जाहले
वेगळीच भेटते नित्य नवी ती कविता सांगेल
शब्दा शब्दांमधून वेचली ती भावना बोलेल
मीच होते कालची ती आजची ही मीच केवल
जरा वेगळे होते स्वत:तून तेव्हा मीच सापडेल
आज जाणिले मीच मला परकी का जाहले
आल्या गेल्या जन्माची कथा संगती नेइल..
