जरा नीरवता झुरते
जरा नीरवता झुरते
जरा नीरव आहे आज किनारा क्षितिजाचा
भान हरपून चालीते वाट एकलीच सांजेला
जरा शांत आहे आज कोपरा या मनीचा
क्षण हरवूनी जाती गुज सांगताच सांजेला
जरा निवांत होता आज तळ त्या सागराचा
लाट बेभानली जणू भेटताच ती किनर्याला
जरा स्वस्थ आहे आज भाव तुज मनीचा
क्षोभ ओठावरला शब्द खिळताचा जिव्हाला
जरा रिकामा आहे आज मेघ तो नभीचा
ढग खुळावल जरसा भाव कोंडल्या धरेला
जरा नीरवता झुरत आहे प्राण या श्वासाचा
जीव आणिक आतुरतो मरणास जगणे सांगायला ..

