STORYMIRROR

Suhas Bokare

Romance Tragedy

3  

Suhas Bokare

Romance Tragedy

पलीकडे

पलीकडे

1 min
221

जरी मला पलीकडे मधाळले तू

कधी सखे मला गळयात माळले तू ?


क्षणोक्षणी घराकडे वळायचो मी 

मला हजारदा फुकात टाळले तू


उरातला तुझ्या असेन कारखाना 

तसे मला सखे तुझ्यात जाळले तू


वही तुझ्या स्वतः पुढे धरायची तू 

जरी वहीतही मलाच चाळले तू 


पसरल्या अनेक त्या हवेत बाता

मला नशेतला म्हणून गाळले तू


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance