पती परमेश्वर..!
पती परमेश्वर..!
लक्ष्मी नारायणाचा जोडा
पहावा सदैव अंतरी थोडा
अडणार नाही कधी घोडा
हाच जीवनाचा पहिला धडा
कराग्रे वसते लक्ष्मीने
सुरुवात दिवसाची होते
आणि करमुले तू गोविंदम
म्हणून दिवसाची सांगता पार पडते
अशा दिनचर्येत एकदा
लक्ष्मी नारायणाची चर्चा जाणली
तेव्हा मात्र मला ती खूप
काही शिकवून गेली
लक्ष्मी म्हणे नारायणाला
नाथ माझे मोल फार मोठे
माझ्या विन हे सारे
मानवाचे जीणे खोटे
नारायण म्हणे लक्ष्मीला
प्राणप्रिये सिद्ध करून बोलावे
मी कसे असे ते सांग
दृष्टांताविना तुझे मानावे
लक्षमीची नजर पडता
एका गर्भ श्रीमंत शव यात्रे वरी
लक्ष्मी निमिशात करती झाली
धन वर्षा त्या वाटेवरी
शव टाकुनी सारी क्षणात धावली
सैरा वैरा धन वेचण्या त्याच पावली
ते पाहुनी म्हणे लक्ष्मी हरिस
पहा मोल किती माझे तुमच्या परीस
स्मित वदने हरी बोलता झाला
शव नाही उठले काय त्याचा गुन्हा
लक्ष्मी म्हणे हरिस शव ते सांगा
कसे उठेल धन वेचण्यास पुन्हा
गाली हसुनी प्रेमभरे हरी
बोलता झाला नेत्र तेजस्वी रोखुन
पहा बरे लक्ष्मी तूच पुन्हा पुन्हा
विचार मनासी करून
अग वेडे प्राण प्रिये सखे
जोवरी मी आहे अंतरात
तोवरीच किंमत लक्ष्मी तुज या जगात
मी जाता होईल ना गे सारे मातीमोल
लक्ष्मी वरमली मनोमनी अंतरात
धरिले प्रेमाने पतीचरण क्षणात
म्हणे पती परमेश्वर नाही असत्य
मान लक्ष्मीस असतो पतीमुळे जनात
रुसवा फुगवा सरून गेला निमिषात
घेतले श्री हरीने लक्ष्मीस कवेत
प्रसन्न लक्ष्मी नारायण पाहिले
स्वप्नी मी असता गाढ झोपेत....!

