STORYMIRROR

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Romance Inspirational

3  

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Romance Inspirational

मियावाकी वन

मियावाकी वन

2 mins
426

धुळ, धूर, अती कर्कश ध्वनी,

ते गढूळ प्रदुषित पाणी;

बघ झाली किती ही हानी,

जे भोगती सकल प्राणी!


बघ झाली किती बेजार,

या धरणीचे किती हाल;

चल लावूया वृक्ष हजार,

वन प्रदुषणावरची ढाल!


वन "मियावाकी" लावून,

चल देऊयात दिलासा ;

बन घनदाट हे फुलवून,

घन बरसू देत जरासा!


फक्त हवी थोडीच जागा,

फळ फुल डेरेदार वृक्षा;

चल फुलवूत वन बागा,

बघ बदलताना भू नक्षा!


वड, पिंपळ, ताम्हण, आंबा,

फळ पेरू, बोर, आवळा;

अन बेल, फणस, कडुनिंबा,

चल लावू या सिताफळा!


हा सोन बहावा, कामिनी,

ही पळस, बकुळी, चांदणी;

ती रक्तचंदन, मोहगणी,

अन जास्वंद, रातराणी !


नभ येतील भरून पाणी,

ढग बरसवतील जल वनी;

वृक्ष ते तृप्त मिळता पाणी,

जल पिऊन तृप्त हो धरणी!


मग येतील पक्षी प्राणी,

बघ फुलती फुले या वनी;

ते वृक्ष ऐकती गाणी,

फळ ते येईल फळूनी!


हे वृक्ष वाढती झरझर,

बघ आली ती फुलपाखरं;

ती खार पळे वर सरसर,

मन तृप्त होईल ते सत्वर!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance