ओल्या बटा
ओल्या बटा
ओल्या बटा मुखावर तुझ्या
वेड लावी माझ्या जीवाला
पाहून गालावरील खळी ती
भूल पडली तुझी मनाला.....
बटा सारूनी केसामागे तू
नकोस त्यांना ठेवू तू दूर
पाहून हे दृश्य प्रीये ग
मनात माजलय ग काहूर.....
ओलेती देखणी तू सुरेख नार
पाहताच वाटे मिठी मारावी
ओली बट तुझ्या गालावरील
हळूच हाताने बाजूला सारावी...
पैंजण पायी हळू रूणझुणले
हाती कंकण मंजूळ नादियले
मुखकमल तुझे लज्जीत झाले
तू तुझे सर्वस्व मज वाहियेले....
ओल्या बटांनी केला गोडवा आपल्यात
मधूर क्षणांचे घट भरले आनंदात
मिठीत सामावलो तुझ्या मी आता
गोड शहारे उठती रोमारोमात...