कळत नाही
कळत नाही


कळत नाही माझेच मला काय झाले
नाव तुझे येताच ओठी लाजणे आले
कळत नाही सोनेरी दिवस हा की रात्र
दिसते चोहीकडे प्रतिमा तुझीच रे मात्र
कळत नाही कसे रे तुला मनातले सारे
मिट पापण्या एकदा वाहती प्रेमाचे वारे
कळत नाही कशी ओढ लागली मनाला
खऱ्या प्रीतिविना सर नाही या जीवनाला
कळत नाही का मन चातकासारखे होई
बरसणार्या श्रावण सरींनीच तृष्णा जाई
कळत नाही कुणा नाते अपुले जगावेगळे
क्षितिजा पल्याड प्रेमाने जे व्यापले सगळे
कळत नाही कशी फेडेल ऋण या जन्मात
साक्षात ईश्वर भेटला मज सावळ्या रूपात