STORYMIRROR

AnjalI Butley

Romance

3  

AnjalI Butley

Romance

सांगा आता तुही पटापट...

सांगा आता तुही पटापट...

1 min
655

सांगान कोणी पटापट..

कुठल्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर

सेल चालू आहे?


सूर्य चंद्र तारे एकावर एक फ्रि मिळतात तेथे!

आहे का काही डिस्काऊंट?


प्रेमिकेला मला सुखद धक्का द्यायचा आहे ते गिफ्ट देऊन!


सांगान कोणी पटापट...


'डिजिटल' युगाच्या आधी

साक्षीला असायचे हे सूर्य चंद्र तारे

आम्हा प्रेमवीरांच्या हाती!


ऊठ सुठ साक्षीला त्यांना ठेवले...

खोट्या आणाभाका घेतल्या...


आता सुर्याला आला राग...

संतापला आहे खुप...

४०-५०च्या डिग्री घेऊन फिरतोय

ईकडे तिकडे...


चंद्र विचारतोय

निंबोणीचे झाडं गेली कुठे?

लपुन आडुन बघण्यास मला आता जागा नसे...


चांदण्या तारे विचारत आहे

सिमेंटच्या ह्या जंगलात

तुम्ही बघणार कसे आम्हाला?


सांगा आता तुम्ही पटापट... 

'सेल', ऑनलाईन शॉपिंग,

 गिफ्ट देण्याच्या का वस्तु आहोत आम्ही?


सांगा आता तुम्ही पटापट...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance