वाट तुझी पाहताना
वाट तुझी पाहताना
वाट तुझी पाहताना मन आतुर होते ,
तू समोर येताच हळूच हसू येते ,
डोळ्यात तुझ्या पाहताना
हळूच लाज गाली येते ,
कशी सांगू तुला मी
आठवण तुझीच येते ,
दूर तू जाताना मनात काहूर माजते ,
तू जवळ येताच मन हुरहूरते ,
का असे होते हे कळेना ना मला ,
हे कोडे उलगडून सांगशील ना मला ,
सतत तू जवळ असावा असे वाटते मला ,
वाट तुझी पाहताना मन आतुर होते ,
तुला पाहताच मी वेडी होते .