स्त्री
स्त्री
1 min
349
आई तू जननी तू या विश्वाची नवनिर्मिती तू
मैत्रीण तू, बहीण तू, बायको तू, मुलगी तू,
प्रसंगी रणरागिणी तू, धैर्यवान तू,
या एका जन्मात किती रूपे तुझी
तरी दुय्यम समजणारी तू,
हो जागी आणि ओळख स्वतःला
स्वतःच्या अस्तित्वाला आणि हो कणखर तू,
दाखवून दे आज आधुनिक जगातील स्त्री तू,
रणरागिणी तू