लग्न करूनी पहावे एकदा
लग्न करूनी पहावे एकदा


लग्न करावे,लग्न करावे,
या भूलोकी,तुम्ही एकदा !
पारतंत्र्य,जरी ही आले,
फसूनी, बघा एकदा !!!!धृ!!
जोडीने साथीने,मंचवी चलावे,
अग्निभोवती,फेरे ,खेळ शपथेचा!
बहारो फुल बरसावो,सुर आळवी,
घेत आशिर्वाद, देव ब्राम्हणांचा !!1
मामा मामी ,पाहुणे राऊळे,
मित्रमंडळी,सवे प्रतिष्ठीत जन!
सुंदर ललना,सजूनी नटल्या,
दोघांत, अंतरपाट धरून!!2
भरगच्च झाले सारे सभागृह,
व्हिडीओ कँमेरे,उसंत नाही मोबाँईलला!
मंगलाष्टकांची,स्पर्धा चालली,
एकापाठोपाठ,सवे ब्राम्हण नमनाला!!3
भावकी बंधातला गोतावळा,
हजेरी लावीत,मंडळी दोन्हीकडची!
आंतरपाटास ही जाणवे,
ओढ,वाढलेली जीवांची !!4
वधुच्या सलज्ज पापण्या
झुकल्या,
स्मित हास्य अन गालावरती लाली!
नेत्रपल्लवी, दोघांत सुरू जाहली,
धडधड ह्रदयाची ,ओठांची थरथर जाहली!!5
मंगलाष्टके,भाषणे फार ,
चालती,जाती सारे कंटाळून !
"वाजंत्री" वाजवा ही ओळ ऐकण्या,
झाले, सर्वांचे आतूर मन!!6
उठा सज्ज व्हा,वरवधुनो,
लग्न घटिका, आली भरूनी,
हार गळी घालण्या,एकमेकांच्या,
वाट,अंतरपाट दूर सारूनी !!7
लग्न लागता, अन्नछत्र चालले,
खाण्यावरी,तुटुनी सारे पडती !
आग्रह करूनी, सर्वांना वाढती,
ताव मारूनी,मिठायावरती !!8
विवाह सोहळा,हा लग्न संस्थेचा,
पती पत्नी नात्याला,समाज मान्यतेचा!
सृष्टीचे,सृजन चालविण्या,
जबाबदारी ,मार्ग खडतर,
संसाराचा!!9