STORYMIRROR

Prashant Shinde

Romance Inspirational

3  

Prashant Shinde

Romance Inspirational

शहाणपण...!

शहाणपण...!

1 min
318

शहाणपण...!


नाद खुळा प्रेमाचा

वाद होई जोमाचा

काळ वाटे मोलाचा

सारीपाट जणू घोळाचा...

मित्र मैत्रिणी सारे

अवती भवती निखारे

बसती आतल्या आत चटके

राग लोभ लटके लटके...

कोण हात देतो

कोण हात दाखवतो

कोण हात चोरतो

कोण हात मिळवणी करतो...

सारे कसे बिनभोभाट

चाले मस्त सुसाट

झाले जरी पोट

आपले पाठी सपाट...

तहान भूख हरपायची

घाई तिला शोधायची

वेळ ती उगाचच पाठ लागायची

लांबूनच डोळे भरून बघायची...

वेळ सरली काळ सरला

दोन वाटा दूर गेल्या

जाता जाता एकाला

जन्मभराचे गालबोट लावून गेल्या...

एक पुढे एक मागे

दोन दिशेला दोन रस्ते

एकाचे जीवन सस्ते सस्ते

दुसऱ्या नशिबी नुसते खस्ते...

पण भलं मोठं शहाणपण आलं

जीवनाचं खरं मोल कळालं

सैराट होऊन मरण्यापेक्षा

विराट होऊन जगणं उमजलं.....

रित्या हाती मागे फिरता

अनुभवाच गटल पाठीशी होतं

तेच माझ्या जीवनात

शिदोरीच काम करणार होतं....!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance