विरह
विरह


दररोज घेऊन नवी पहाट, सूर्य उगवतोय त्याच्या सवयीने
मीही तळपतोय तुझ्याच विरहात, आजही
नित्यनेमाने
दिवसा अखेरीस मावळताना, सूर्य देतो प्रेमी जिवांना आडोसा
तुझ्या आठवणींनी मावळत्या किरणांत, मीही
हरवलोय जरासा
तुझ्या प्रत्येक आठवणीने, ओढ भेटीची वाढतेय
तुझ रूप दिसावं, हि एकच भावना मनी दाटतेय
रात्रीचा चंद्रही दररोज तुझ्याकडे पाहून सुखावतोय
मी मात्र डोळे लावून, त्याच्यातच तुझे प्रतिबिंब शोधतोय