फुलले रे क्षण
फुलले रे क्षण


तुझ्या येण्याने माझ्या सख्या
सुखी जीवनात फुलले रे क्षण
विरक्तीचा भाव कधी येता
विव्हळतेय अंतरंगाची धडकण...
आठवांच्या हिंदोळ्यावर बसूनी
करते विचरण या संसारी
सफल्याच्या स्वानंदाचे हे डंख
अंगाअंगात भरतेय खुमारी...
केव्हा कसे फुलले ती क्षण
भाग्योदय झाल्याचा भरे हुंकार
थरथरत्या तनामनात कसा हा
भरतो सहवासाचा अलंकार..
काय बोलू कसे बोलू आता
तुझ्या ओठांनी बंद केला रस्ताच
रसरसित ज्वारभाटा दाटूनी आला
तनामनाला करी बंदी अन् व्यस्तच...
r>
त्या गरम श्वासांचा भिनतोय
मस्त गुलमोहोर झरतोय
आवाज न होता पुर्णतया
गुंबदापर्यंत दोघेही उडतोय...
मजबूत विळखा तुझ्या बाहुचा
इथे कसा चुरचूर होतोय
स्वर्गातील रंगीत आसमंत
कनाकनात भरूनी ओसंडतोय...
हरखून जाते हे सर्वांग
एकांती स्वतःच होऊनी निसर्ग
फुलते रे राजसा माझे यौवन
तुझ्या मिठीतूनी अलगद संसर्ग....
हवाहवासा तुझा सहवास हा
तनाच्या कानाकोपऱ्यात थरथरतेय
मदहोश होई सर्वांग बेंधूंद नशेविना
वाऱ्यासंगे शांत शीतल हरवतोय....