प्रेम हे
प्रेम हे
कुणीतरी म्हणलय...
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आमचं सगळं सेम असतं
मी म्हणते असं कसं सेम असतं...??
कुणी घेतं वस्तुंचा आधार
तर कुणी घेतं चंद्राला कुशीत
आपल्या प्रिय ला मनवायला
प्रत्येकाची नवी रीत ।।
कुणाच लग्नाआधी खुलतं
तर कुणाचं बंधनात
अडकल्यावर उलगडतं ।।
कुणाच ऐन तिशीतच संपतं
तर कुणाचं साठी पार होऊन सुद्धा
चिरकाल टिकतं ।।
कुणासाठी प्रेम म्हणजे
त्याला/तिला मिळवणं
तर कुणासाठी आपल्या
प्रिय ला दुरून हि सुखात बघणं।।
कुणासाठी एकत्र खाल्लेली
पाणीपुरी म्हणजे प्रेम
तर कुणासाठी एकत्र नसूनही
प्रत्येक क्षणाला आलेली आठवण
म्हणजे प्रेम ।।
कुणासाठी प्रेम म्हणजे ध्यास
तर कुणासाठी केलेला त्याग
कोण म्हणतं प्रेम आंधळ असतं
तर कोण म्हणतं खरं प्रेमच डोळे उघडतं ।।
कुणाच असं असतं
कुणाच तसं असतं
प्रेम हे प्रेम जरी असलं
तरी प्रत्येकाच वेगळं असतं ।।
प्रत्येकाला प्रेम जरी होत असलं
तरी प्रत्येकाचं प्रेम मात्र सेम नसतं
एवढं सगळं असूनही माझ्यासाठी
प्रेम हे प्रेमच असतं
तुमच आमचं सेम जरी नसलं तरी
एका हृदया पासून दुसऱ्या हृदयापर्यंत
पोहचण्याचा ते मार्ग असतं ।।

