तुझं माझं नातं❤️
तुझं माझं नातं❤️
तुझं माझं नातं
ऊनपावसाचा खेळ
तुला हवं असत निरभ्र आकाश
तर मला आवडत दाटलेल आभाळ
तुला आवडते मोकळीढाकळी वाट
तर मला हवी असते गर्दीतली तुझी साथ
तुला आवडते गोड गुलाबी थंडी
तर मला झुरुझुरु वाहणारी सरी
तुला आवडत भरभरून बोलायला
मला आवडत शांत राहून तुला बघायला
तुला आवडत वेगवेगळं वाचायला
अन मला आवडत तू वाचलेलं ऐकायला
तु रमतो तुझ्या नाटकातल्या रंगात
तर मी हरवलेली असते तेव्हा तुझ्याच ढंगात
तुला आवडत रोख रहायला
अन मला आवडत धीरान घ्यायला
तुला आवडत प्रॅक्टिकलचे धडे द्यायला
अन मला आवडत इमोशनल राहायला
तुला जमत हळूहळू रुसायला
अन मला आवडत
गोड हसून तुला मनवायला
तुला जमत माझ्या चुका सांगायला
तर मला आवडत तू सांगितलेलं शहाण्याबाळासारखं ऐकायला
तुला आवडत जगभर घुमायला
तर मला आवडत एकाच
जागी शांत जगायला
तुला जमत नेहमी तटस्थ रहायला
अन मला तुझ्यात गुंतायला
अस सगळं आहे म्हणून शेवटी....
तुझंमाझं नातं म्हणजे
ऊनपावसाचा खेळ
सोबत नाही तरी
आठवणींचां मेळ
