पाऊस आला
पाऊस आला


आला पाऊस आला आला
हिरव्या मातीत मोर वनी नाचला.....
रिमझिम-रिमझिम आला खाली
धरतीमाता झाली ओली
अंतरातून आला उमाळा........
झिरमिर-झिरमिर पागोळ्यांची
संथ लयीतील ऐका गाणी
सूरतालाचा खेळ कसा रंगला........
चमचम-चमचम चमके बिजली
धडाडढुमढुम ढोल वाजवी
थेंबाथेंबाने बरसत आला..........
गरगर वायू गिरक्या घेई
पाचोळ्याला घुमवित राही
पानाफुलांना हसवित आला........
पदन्यास ते सुरेख टाकीत
वर्षाराणी आली ठुमकत
जीवसृष्टीला आनंद झाला.........