STORYMIRROR

Asmita Vaidya

Inspirational

3  

Asmita Vaidya

Inspirational

वारं लागलिया भरभरू

वारं लागलिया भरभरू

1 min
326

' वारं लागलंया भरभरू '


वारं लागलंया भरभरू

तारू नग सख्या हाकारू.......


दूरवरून येतीया साद

पिसाटाचा सूंsसूंs सूं नाद

लाटांवरी लाट बेफाम

अवलिया लागे फुत्कारू.......


शिडं फाटलं बघ वा-यानं

धोका दाविला बावट्यानं

हेलकावे देई दणक्यानं

म्होरं काळ होई साकारू.......


समिंदराची ऐक ती गाज

बेफाम झालिया आज

खवळूनी दावितो माज

आता कशी धनी सावरू........


मावरं भरूनिया टोकरीत

गाठू किनारा तो झटक्यात

चल सारंगा जाऊ पांदीत

नग तारू दूर हाकारू.........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational