पाऊस
पाऊस
आला पाऊस पाऊस
सा-या जीवांचा विसावा
आला सुखाचा हा काळ
देतो पावशा दिलासा
आगमनाची हो ज्याच्या
फिरवितो वायु द्वाही
झाडाझाडांच्या कानात
गुणगुणे दिशा दाही
ताशे नगारे वाजवीत
स्वारी वरुणाची आली
पायघड्या त्या रुपेरी
नभ गुलाल उधळी
लोळ कल्लोळ कल्लोळती
क्षणी तिमिर भेदिती
असिधाराच की जणु
आसमंती शलाका ती
टिप् टिप थेंबांची ती
सुरू झाली की बरसात
चिंब चिंब भिजविसी
प्रसन्नता ये मनास
