STORYMIRROR

Asmita Vaidya

Others

3  

Asmita Vaidya

Others

आखाड

आखाड

1 min
138

आखाडाची लागलीया झड

किती झालीया ही पडझड

माज्या जीवाची लई तडफड

कशी काढू मी आजची नड


तीन दगडांची माझी चूल

जाली बगा की हो मातीमोल

टीनपाटं बी वाहून गेलं

सरपन बी जालं वलं


दिस सारा गेला वल्यात

हुडहुडी भरली अंगात

सारी वलीच की ही धडुतं

कुटं ठिवूं लेकरू माजं?


कुनी यील का मदतीस?

माज्यावानीच त्येंची बी गत

यकादशीच्या झोपडीत

शिवरात्री आली दारात


आता कुनी फुडारी यील

आसू ढाळीत भासन दील

झोपडी दादाच्या संगटीन

काहीबाही देऊ करील


आवो उटा की जाग्यावरून

हतं हाये का उपेग बसून

दरसालीचं आपुलं रडनं

कुनी दिलं का पैकं आनून


त्या फुडार्‍याचं काय ऐकता

त्याची बोलाचीच की भासा

अनुभोवान व्हाव शानं

लावू ठिगाळ आपुलं आपनं  


साहित्याला गुण द्या
लॉग इन