मेंदीचा सुवास...
मेंदीचा सुवास...


तुझ्या नावाची मेंदी
रंगली होती माझ्या हातावर
जीव टाकला होता ओवाळून
सुखद त्या क्षणांवर...
हात दिला होता तुझ्या हाती
कायम असाच राहण्यासाठी
प्रीत भारलेले क्षण ते
ह्रदयात जपण्यासाठी...
विवाहानंतर गेलास सीमेवर
मेंदीचा सुवास दरवळला हातावर
येई जेव्हा जेव्हा तुझी आठवण
विरहाचे घाव होती व्याकुळ मनावर ...
रमते आता स्वप्नात तुझ्याबरोबर
लग्नातील त्या आठवणींसवे
एकांतातच झुरते आता
नयनांतील आसवांसवे ...