STORYMIRROR

Shanti Gurav

Tragedy

3  

Shanti Gurav

Tragedy

हतबल वसुंधरा

हतबल वसुंधरा

1 min
240

ती रडत आहे, तिचे रडणे 

   तुमच्या कानापर्यंत पोहचत आहे का ?

तिचे दबलेले हुंदके

   तुमच्या मनाला स्पर्श करतात का ?

तिचा आर्त चित्कार 

    तुमच्या हृदयाला भेदून जातो का ?

कोण ती ? ती तर आपली वसुंधरा 

    तिचे आधीचे रूप आठवते का तुम्हाला ?

हिरव्यागार वनश्रीने नटलेले

    तिचे सळसळते तारुण्य पाहिले आहे का ?

लकाकत्या नद्यांच्या हारानी 

    शृंगारलेले तिचे रूप पाहिले आहे का?

स्वच्छ, शुद्ध पावन वायुने

    बहरलेले तिचे जीवन नजरेला पडले आहे का ?

असे हे वसुंधरेचे कोमल लावण्य

    कधीच तुमच्या नजरेस पडले नाही का ?

अशी कशी झाली तिची ही दशा

    आपल्याला ती का दिसते अशी जीर्ण रूपात?

तिची ही दीन हीन अवस्था

    आपल्याच कर्मामुळेच नाही का ?

तिचे अलंकार ओरबडून नेताना

    कुणाला काहीच वाटले नाही का ?

तिच्या अंगावरची लक्तरे पाहून

     कुणाचीच मन शरमेने खाली गेली नाही का ?

या विकल अवस्थेला जबाबदार आपण

     मग का कुणी येत नाही वाचवायला ?

तिच्या थांबत चाललेल्या श्वासाला

     कोणी का येत नाही प्राणवायु द्यायला ?

का प्रत्येकजण थांबला आहे 

     तिला शेवटपर्यंत ओरबाडायाला ?

कदाचित तिची शेवटची किंकाळी ऐकूनसुद्धा

     पाझर फुटणार नाही कुणाच्या हृदयाला.

मग एक दिवस शेवटचा आचका देऊन

     संपून जाईल जीवन तिचे कायमचे.

त्याबरोबरच संपून जाईल या विश्वातून 

     चराचराचे अस्तित्वही कायमचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy