Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shanti Gurav

Others

3  

Shanti Gurav

Others

महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा

1 min
189


जयजयकार महाराष्ट्राचा या आसमंती गर्जावा दिन हा बलिदानाचा अभिमानाने साजरा करावा. 


धन्य धन्य हा महाराष्ट्र माझा

 इथे जन्मले आपले शूर महान शिवाजी राजा.


किती वर्णावा गोडवा इथल्या मराठी भाषेचा नसानसात भिनलेल्या या राजभाषेचा. 


साद घालतो शिखर सह्याद्रीचा 

फडकतो झेंडा इथल्या गडांवर आपल्या अभिमानाचा. 


रचले रत्नजडित ओवी, अमृतमय अभंग संतांचे 

दऱ्याखोऱ्यांतून दुमदुमले स्वर शाहिरी पोवाड्यांचे. 


उदर भरण्या दूरदूरूनी येती जन 

महाराष्ट्राची शान आहे मुंबई मेरी जान. 


पराक्रमाचा इतिहास लाभला याला महान वीरांचा 

सगळ्यांनीच प्रेमाने जपला वारसा विविध संस्कृतींचा. 


पुरातन परंपरा व आधुनिकतेचा दिसतो इथे संगम 

याच्या उभारणीला अनेकांनी दिले आपले तनमनधन. 


कृष्णा, गोदा, पंचगंगेच्या जलाने पावन झाली ही धरती 

भूमिपुत्रांच्या घर्माने सुवर्णमय झाली इथली माती. 


इथे जन्मले फुले, टिळक, भीमराव, गोखले, आगरकर 

साहित्याचा भंडार पुलं, कुसुमाग्रज, अत्रे, माडगूळकर. 


दिसती इथे सुंदर लेणी, मंदिरे कोरलेली पाषाणी 

निसर्गसौंदर्याच्या पसरल्या इथे खाणीच खाणी. 


होते साधना दिन रात संगीत, नाटक, सिनेमाची 

नशिबाची दारे उघडतात येथे आलेल्या प्रत्येकाची. 


या मातीने दिली हिमत लढताहेत संकटाशी सर्व त्वेषाने 

यातूनही उभा राहील महाराष्ट्र माझा ताठ मानेने. 


आहे विश्वास, दूर राहुनी हातात आहे हात 

प्रेम, एकता, बंधुता आहे माझ्या महाराष्ट्रात.


Rate this content
Log in